वैराग ता.बार्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेस मंजुरी मिळावी या प्रश्नी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी.मुख्यमंत्र्यांचे शासकीय वर्षा निवासस्थान मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांची भेट घेतली प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन घेण्याबाबत विनंती केली. याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील वैराग ता.बार्शी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित बृहद आराखड्यात समावेश करुन त्याचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय करणे आवश्यक आहे. तसेच वैराग हे नगरपंचायत चे ठिकाण असुन येथील नागरिकांनी उपचारासाठी सोलापूर अथवा बार्शी येथे जावे लागत असुन दोन्ही ठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी गैरसोयीची असुन ग्रामीण रुग्णालय झाल्यास याचा लाभ येथिल नागरिकांना होणार आहे.
या मागणीचा शासनाने लवकरात लवकर विचार करावा व रुग्णालयाच्या मागणीचा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून वैराग व परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम