Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द

अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द

मित्राला शेअर करा

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.तसेच दहावीच्या गुणानुसारच अकरावीमध्ये प्रवेश दिले जावेत,असेही कोर्टाने राज्य सरकारला म्हटले आहे.सीईटीसंदर्भात राज्य सरकारने 28 मे रोजी अध्यादेश काढला होता.हा अध्यादेश कोर्टाने रद्द केला आहे.

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही.त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.