सध्या राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
या जिल्ह्यात पडणार पाऊस
उद्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो.
याशिवाय खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक