Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > पुढील ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस – हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुढील ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस – हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस - हवामान विभागाकडून अलर्ट जारी

सध्या राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

या जिल्ह्यात पडणार पाऊस

उद्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो.

याशिवाय खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.