Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी पोलीस स्टेशनच्या D.B. विभागाची सतर्क कामगिरी

बार्शी पोलीस स्टेशनच्या D.B. विभागाची सतर्क कामगिरी

मित्राला शेअर करा

बार्शी: येथील पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना, परळी ते पंढरपूर एसटी बस मधून पाणी पिण्यासाठी एक वृद्ध महिला कमलाबाई गंगाधर कटारे वय 65 रा. मोरवाडी ता.वडवणी जि. बीड यांच्या गळ्यातील 30 सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र पडलेले दिसून आले.

पेट्रोलिंग करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत लगेच एसटी कर्मचाऱ्यांना फोन करून त्या महिलेला कळवले, पण त्या आजी घाबरलेल्या असल्यामुळे त्या बार्शीला परत आल्या नाहीत.

आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना अविनाश पवार यांनी शोधून परत बोलावले आणि त्यांना त्यांचे मंगळसूत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या हस्ते परत देण्यात आले..

ही कामगिरी अमोल माने, वैभव ठेंगल, अविनाश पवार, अर्जुन गोसावी, राहुल उदार, रामेश्वर मस्के, या पोलिस कॉन्स्टेबल यांनी केली..