Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी सहावीची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न

महाराष्ट्र विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी सहावीची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न

मित्राला शेअर करा

दि.26/8/2023 रोजी संत तुकाराम सभागृह बार्शी या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी या वर्गाची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.

या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आनंद कुमार करडे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे मॅडम होते तसेच उपमुख्याध्यापक सपताळे सर , ज्येष्ठ शिक्षक महामुनी सर व इयत्ता पाचवी ते सातवीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री स्वप्निल पाटील सर व श्रीमती गव्हाणे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले. अनेक महिला तसेच पुरुष पालकांनीही आपले शाळेविषयीचे मनोगत व्यक्त केले. सर्व पालकांकडून शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक सभा संपन्न झाली या पालक सभेचे आभार प्रदर्शन श्रीमती झाडे मॅडम यांनी केले