Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > महाराष्ट्र विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्र विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम

मित्राला शेअर करा

रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील जवानांना, डॉ. एम. एस.बेग हैदराबाद (सामाजिक कार्यकर्ता) व रा.रा.पोलीस.बल.गट क्र.१० सोलापूर (ई- कंपनी) यांना पाठविल्या.समाजाचे आपण काहीतरी देणं असतो या उक्तीप्रमाणे स्व-कौशल्य जागृत करून अप्रतिम राख्या तयार केल्या.

या विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी श्रीमती सुहासिनी शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.


तसेच राखी मिळताच जवानांनी व डॉ. एम.एस. बेग यांनी विद्यार्थिनींना खाऊ देऊन बंधू प्रेमाचा सन्मान बहिणीस दिला.


भारतीय संस्कृतीमधील प्रेमळ,अतूट, पवित्र बहीण भावांचे नाते सुरक्षेच्या बंधनात बांधणारे सन व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सैन्य व पोलीस दलामधे घरापासून दूर कर्तव्य बजावणाऱ्या भावंडानसाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी अवस्मरीन सुंदर असा उपक्रम केला.
डॉ.बेग,पोलीस अधिकारी व जवानांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.


या सुंदर अशा उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे यांनी श्रीमती सुहासिनी शिंदे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.