सोलापूर : डाॅ . रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांना ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) जाहीर करण्यात आला होता.त्याला एक वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या सन्मानात दिवसेंदिवस भर पडत आहे अणि ती ही आंतराष्ट्रीय पातळीवर.
डाॅ. रणजितसिंह डिसले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे . युनोस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला त्यातच आता अमेरिकेकडून डिसले गुरूजींना प्रतिष्ठित समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती (Fullbright scholarship) जाहीर करण्यात आली आहे.
पीस इन एज्युकेशन (Peace in Education) या विषयामध्ये अमेरिकेत संशोधन करण्यासाठी डाॅ. रणजितसिंह डिसले यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित आणून शैक्षणिक संशोधन करण्याची संधी दिली जाते. जगातील अशांत देशांमध्ये भारत-पाकिस्तान, इराण-इराक, अमेरिका-उत्तर कोरिया एकमेकांविरोधात द्वेष भावना उत्पन्न होत असल्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा उपक्रम हाती घेतला. अहिंसेच्या विचाराच्या प्रचार प्रसाराचं काम ते करत आहेत. याच विषयावर संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असं डिसले गुरूजींनी सांगितलं आहे.
त्यांच्या नाविन्यपुर्ण उपक्रमांमुळे ते जगभरातील 50 इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान झाले आहेत.
संगणकाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे कोऑर्डिनेटर म्हणून काम पहातात, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, प्लीपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतराष्ट्रीय संस्थाच्या प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या संधीमुळे जगातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधन करण्याची संधी डिसले गुरूजींना मिळणार आहे.
More Stories
संवर्धन समिती बार्शी, गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024
प्रिसिजन वाचन अभियानगुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी!
महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड