Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > अमोल पाटील यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त शिरसाव येथे 185 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे वाटप

अमोल पाटील यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त शिरसाव येथे 185 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे वाटप

मित्राला शेअर करा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाव तालुका परांडा येथे श्री अमोल रामहरी पाटील यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त पहिली ते चौथी च्या एकूण 180 ते 185 विद्यार्थ्यांना वाचन लेखन ,साहित्य वाटप करण्यात आले

कार्यक्रमात राजाभाऊ चोबे सर यांनी कोरोना काळात झालेल्या झालेली शैक्षणिक हानी सुधारणेसाठी या वाचन, लेखन ,साहित्याचा वापर करावा व या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्री. राजाभाऊ मिसाळ सर प्राथमिक शिक्षक श्री. ढगे सर सौ .गुंजाळ मॅडम यांनी सहकार्य केले. तसेच गावातील माजी सरपंच श्री अनिल पाटील श्री अनंत जाधव श्री. ज्योतिराम पाटील श्री.आबासाहेब मुके श्री. बाळासाहेब वायकुळे मेजर विठ्ठल गावकरे श्री. विशाल झोरी श्री .पांडुरंग चोबे श्री. संतोष चोबे कार्यक्रमास पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले साधन व्यक्ती श्री .डोके सर व श्री .साबळे श्री. बन सर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सांगता व शाळेच्या वतीने श्री अमोल पाटील यांचा वाढदिवस साजरा करून शाल व श्रीफळ दिले करून कार्यक्रमाची सांगता केली गावातील अमोल पाटील मित्र मंडळ सहभागी होते.

आज आपण पाहतो की वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे फटाके यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो परंतु हा खर्च तात्पुरता आनंद मिळवून देणारा असला तरी याचा समाजासाठी काडीचाही उपयोग होत नाही परंतु हाच खर्च योग्य सामाजिक कार्यासाठी वापरला तर यातून गरजूंच्या चेहर्‍यावर येणारा आनंद नक्कीच दीर्घकाळ टिकेल याच भावनेतून अमोल पाटील यांचा हा आदर्श उपक्रम नक्कीच कौतुकास्पद अणि तरुणांना प्रेरणा देणारा आहे.