बार्शी – अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या बार्शी तालुका युवक अध्यक्षपदी येथील पत्रकार गणेश दगडू घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय घोलप,सरचिटणीस सुजित धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मनीष उर्फ बंटीशेठ निकुडे – पाटील यांनी निवडीचे पत्र दिले.
गणेश घोलप यांनी बार्शी शहरात केलेल्या समाजहिताच्या व सामाजिक कार्याची दखल घेत तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला असल्यामुळे त्यांना हे पद देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष निकुडे – पाटील यांनी सांगितले.
घोलप यांच्या निवडीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस सुजित प्रभावळे, लातूर युवक जिल्हाध्यक्ष रोहित थोरात, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष संतोष क्षिरसागर,उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष दिनेश पलंगे आदींनी स्वागत केले असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी घोलप म्हणाले की हिंदू खाटीक समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलती मिळवून देणार असून समाजोपयोगी कामे करणार आहे. घोलप यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award