खासदार छत्रपती संभाजीराजेंनी (Sambhajiraje Bhosle) आपली पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
यावेळी संभाजीराजेंनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
छत्रपती संभाजीराजेंची ‘स्वराज्य’ घोषणा
संभाजीराजे छत्रपतींचे २ निर्णय :
१. येत्या जुलै २०२२ मध्ये ६ जागा रिक्त होणार असून, बदलत्या समीकरणांमुळे राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणार असून माझ्या केलेल्या कामांसाठी मला सर्वपक्षीय नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा.
२. समाजाला नविन दिशा देण्यासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, शिव शाहूंचे विचार देशभर पोहचवण्यासाठी आम्ही “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात येणार आहे.
सर्वांना संघटीत करण्यासाठी संभाजीराजेंनी ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आणि आम्ही सर्व एक संघटना स्थापन करणार आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली.
यावेळी ते म्हणाले की मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करत आहे, असं संभाजीराजे म्हणाले. तर यावेळी बोलताना मी कुठल्याही पक्षात नसल्याचं देखील संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जनसेवा करायची असेल तर राजसत्ता हवी. यंदा मी राज्यसभेची निवडणूक लढवणार. आणि ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी या पत्रकार परिषदेत दिली.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत