वीरशैव-लिंगायत समाजाचे सर्वागीण विकासाकरीता काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार शासनाकडून दिला जातो.
पुरस्काराकरीता इच्छुक पात्रताधारक व्यक्ती व संस्थेने अर्ज करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहा. संचालक मनिषा फुले यांनी केले आहे.
वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध (अक्षय तृतीय) या दिवशी एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार जाहीर केला जाणार आहे.
सदर पुरस्कार हा वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी पुरुष वयोमर्यादा किमान 50 वर्षे तर महिला किमान 40 वर्षे असून सामाजिक संस्थेसाठी सदर क्षेत्रातील किमान 10 वर्षे कार्य असा निकष आहे. इच्छुक व्यक्तींनी संस्था यांनी 15 (पंधरा) दिवसांच्या आत 4 प्रतीमध्ये सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, 26 अ अहिंसा, सिध्दजीन हौसिंग सोसायटी, मुरारजी पेठ, सोलापूर कार्यालयामध्ये आपले अर्ज व संबंधीत कागदपत्रे सादर करावेत असे आवाहनही इतर मागास बहुजन कल्याण सहा. संचालक मनिषा फुले यांनी केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद