बार्शी : माळे गल्लीतील अमोल संतोष शिरामे व ऐश्वर्या धनाजी शिरामे या बंधू भगिनीने भारतीय लष्कर आणि तलाठी पदावर यश मिळविल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी दोघांचा सत्कार करण्यात आला.
अभाविपचे प्रांत उपाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब घावटे, मोहन शिरामे, गजानन कुलकर्णी, जितेंद्र मोरे, राजाभाऊ वाघमारे, भैया राऊत, संतोष शिरामे यावेळी उपस्थित होते.
ऐन कोरोनाच्या काळात वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्रच हरपले तरी न डगमगता आई संगीता यांनी दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मोठी मुलगी सध्या पुणे येथे इन्फोसिस कंपनीत नोकरीस आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्येही ऐश्वर्या आणि अमोल या दोघां चुलत बहीण भावांनी हे उत्तुंग यश प्राप्त केल्याने त्यांचे विशेष कौतुक प्रा. घावटे यांनी यावेळी केले. स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन या दोघांचाही सत्कार करण्यात आला.
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील