Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > कलाशिक्षक महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी रामचंद्र इकारे (बार्शी) तर प्रदेश सहचिटणीस पदी सुहास पाटील (सांगली) यांची निवड

कलाशिक्षक महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी रामचंद्र इकारे (बार्शी) तर प्रदेश सहचिटणीस पदी सुहास पाटील (सांगली) यांची निवड

मित्राला शेअर करा

दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची प्रदेश कार्यकारणी ऑनलाइन सभा पार पडली. या सभेत महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय विनोद इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांचे विवेचन झाले.

यात कला शिक्षकांच्या व कला विषयाच्या शासन दरबारी प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. तसेच काल दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी. प्रदेश कार्यकारणी वरील दोन जागा रिक्त झाल्यामुळे त्या जागी आता नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष म्हणून.मा.रामचंद्र इकारे सोलापूर जिल्हा. यांची एक मताने निवड झाली. तर प्रदेश सहचिटणीस म्हणून मा. सुहास पाटील सांगली जिल्हा यांची एकमताने निवड झाली.

तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय सुनील जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडीस शुभेच्छा म्हणून प्रदेशाध्यक्ष, माननीय, दादासाहेब विनोद इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रल्हाद शिंदे, प्रदेश सरचिटणीस माननीय प्रल्हाद साळुंके, प्रदेश कोषाध्यक्ष माननीय राजेश निंबेकर, प्रदेश सदस्य माननीय, विवेक महाजन, प्रदेश सदस्य माननीय नवाब शहा, प्रदेश सदस्य माननीय रमेश तुंगार, सर्व विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी, सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी, सर्व तालुका व तालुका कार्यकारणी यांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ यांच्या वतीने देण्यात आली