Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन राहण्यास येणाऱ्यांची पोलिसांना माहिती द्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन राहण्यास येणाऱ्यांची पोलिसांना माहिती द्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन राहण्यास येणाऱ्यांची पोलिसांना माहिती द्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
मित्राला शेअर करा

सोलापूर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी यात्रा 30 जून ते 13 जुलै 2022 या कालावधीत भरत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात नव्याने राहण्यास येणाऱ्यांची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी केले आहे. हे आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहतील.

त्यांनी आदेशात पुढीलप्रमाणे म्हटले आहे, यात्रेचा मुख्य दिवस दि. 9 जुलै 2022 दशमी दि.10 जुलै 2022 एकादशी व दि. 13 जुलै 2022 पौर्णिमा निमित्त गोपाळपूर येथे गोपाळकाला व दि. 14 जुलै 2022 रोजी महाद्वाराला होवून आषाढी वारीची सांगता होते. दि.2 जुलै 2022 रोजी संत श्री. गजानन महाराज, दि.4 जुलै 2022 रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज, दि.5 जुलै 2022 रोजी संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतात. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदीर हे वारकरी संप्रदायातील तसेच इतर भाविकांचे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत असल्याने आषाढी वारीस संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व भारतामध्ये कुंभमेळ्यानंतर एक महत्वपूर्ण यात्रा म्हणून आषाढी यात्रेला अत्यंत महत्व आहे. यात्रेस 12 ते 14 लाख भाविक/वारकरी पंढरपूर येथे येतात. या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या व मोठ्या यात्रेत एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये. यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 30 जून ते 13 जुलै 2022 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या हद्दीत जी-जी व्यक्ती नव्याने राहण्यास येईल त्या व्यक्तीस व जे कोणी अशा व्यक्तीस राहण्यास जागा उपलब्ध करुन देईल असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजेन्ट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादीचे विश्वस्त यांना अशा अनोळखी नवीन रहावयास आलेल्या व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती न चुकता तो राहावयास आल्यानंतर किंवा विचारपूस केल्यावर लगेच संबंधीत पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या एखाद्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होवू शकतो व सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होईल.

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व लॉज, हॉटेल, फ्लॅट, दुकाने, घरमालक, प्रॉपर्टी डिलर / बोकर / एजंट, जुने घर विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संख्या, भाड्याने घर देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे.

आषाढीवारी कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशिद, मंदिर व खाजगी निवासस्थाने याठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटवल्याशिवाय राहण्यास परवानगी देवू नये. भाडेकरुकडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती घ्याव्यात. आषाढी वारी कालावधीत स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये. तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.