Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > कुस्तीसाठी विकली जमीन, मुलीने खेलो इंडिया युवा स्पर्धेत मिळवले रौप्य पदक

कुस्तीसाठी विकली जमीन, मुलीने खेलो इंडिया युवा स्पर्धेत मिळवले रौप्य पदक

कुस्तीसाठी विकली जमीन, मुलीने खेलो इंडिया युवा स्पर्धेत मिळवले रौप्य पदक
मित्राला शेअर करा

५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक ( silver medal) मिळवले.

कुस्तीसाठी विकली जमीन

वाशिमसारख्या जिल्ह्यातून आलेल्या कल्याणी गादेकरचे कुस्तीतील राष्ट्रीय यश कौतुकास्पद आहे. गावात किंवा परिसरात कोणतीही तालिम नसताना तिने आतापर्यंत खेलो इंडियात दोन पदक मिळविली आहेत. कॅडेटच्या कुस्तीतही ती पदकविजेती आहे.

तिच्या वडिलांनी कुस्तीसाठी शेतातच माती टाकून तालिम बनवली. याच तालमीत तिचे इतर भावंडेही सराव करतात. मुलींनी कुस्तीत पुढे जावे यासाठी, कल्याणीच्या वडिलांनी तिला हरियाणात प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने आता ती साईचे अमोल यादव (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींना कुस्तीत खुराक कमी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास साडेचार एकर जमीन विकली आहे.

त्यांची जिद्द आणि मुलांच्या मेहनतीमुळे कुस्तीत पदके मिळत आहेत. गादेकर कुटुंबियांची कहाणी फोगट भगिनींसारखीच आहे. साईच्या विभागीय संचालक सुश्मिता ज्योतिषी यांनीही कल्याणीच्या खेळाचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी हरियाणातील आखाडा चांगलाच गाजवला. कल्याणी गादेकर च्या कुस्त्यांनीही वाहवा मिळवली. मात्र, तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.