गौर तालुका कळंब येथील महिला पेंटर असलेल्या वर्षा विजय कांबळे यांना लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने “सावित्रीची लेक “हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या192 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांच्या हस्ते न्यू महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मंगळवार दि 3 जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
लोकशाही लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
वर्षा विजय कांबळे या ग्रामीण भागात राहणाऱ्या. महिलेने स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी मेहनत व परिश्रमाने पेंटिंग क्षेत्रात शिरकाव करून कलर कामातील सर्व खाच- खळगो अवगत करून परिपूर्ण ज्ञान मिळवून स्वतःचा पेंटिगचा व्यवसाय सुरू केला आहे.त्या स्वतः रंगकाम, टेक्चर, डिझाइनिंग ची कामे करतात तसेच मोठमोठी कामे कारागिराबरोबर त्या स्वतःही करतात, त्यांच्या कलर कामातील जिवंतपणामुळे त्यांना आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही काम मिळत आहे.त्यांच्या या कामामुळे पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व विवेक फाउंडेशन यांनी 8 मार्च 2022 महिला दिनी जनाई -मुक्ताई भूषण पुरस्कार 2022 देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पुणे येथे गौरव करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्या बद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व महिला बचत गटांनी त्यांचा सत्कारही केला होता. कलेच्या क्षेत्रात मिळवलेल्या या प्रावीण्याबद्दल व त्यांच्या कामाची दखल राजधानी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती यांच्याकडून 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी “सावित्रीची लेक” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या101 महिलांचा जनकल्याण समिती नवी दिल्लीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि 3 जानेवारीरोजी न्यू महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे केंद्रीयअर्थ राज्यमंत्री भागवत भागवतराव कराड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष सौ. प्रतिभा सोळसे महासचिव विक्रम सोळसे स्वागत अध्यक्ष विनोद जाधव हरियाणाचे उद्योगपती कुलविदर सिंग हेही उपस्थित होते.यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पुरस्कार प्राप्त महिलांना शुभेच्छा देऊन महिलांच्या विविध योजना सांगून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलेचा राजधानी दिल्लीत पुरस्कार देऊन सन्मान झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा भरातून अभिनंदन होत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद