बार्शीतील शासकीय विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टी(काशीराम) तालुका आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅंथर राहुल भाऊ प्रधान मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन भालेराव यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच सचिन लोकरे सर यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून व कृष्णा शिंदे शहर उपाध्यक्ष शहर महासचिव सुहास शिंदे व युवक अध्यक्ष राहुल महादेव बोकफोडे यांची निवड करण्यात आली
यावेळी बार्शी तालुका अध्यक्ष शरद बनसोडे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुमित खुरंगळे प्रवीण रिकिबे रवि गायकवाड गिरीश कांबळे हे उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी