बार्शी : सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना गेल्या 21 वर्षापासून दिले जातात यावर्षी सन 2024- 25 चे पुरस्कार जाहीर झाल्याचे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे यांनी सांगितले.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ व बुके असे आहे या पुरस्काराचे वितरण माननीय शिवाजीराव डिसले शेठ यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता अर्णव शिक्षण संकुल सासुरे फाटा वैराग (सोलापूर-बार्शी ) रोडवर खालील विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी दिली
सामाजिक पुरस्कार – श्री नागनाथ मल्लिकार्जुन उंबरे, बावी (आ) ता बार्शी.
शैक्षणिक पुरस्कार – श्री मिरगणे विलास पांडुरंग, मळेगाव ता बार्शी
क्रीडा पुरस्कार – श्री दिपक दत्तात्रय चिकणे, सोलापूर
महिला भूषण पुरस्कार – सौ शुभदा अनिरुद्ध देशपांडे सोलापूर
सांस्कृतिक पुरस्कार – श्री दिपक बजरंग नलवडे, कोरफळे ता बार्शी
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – श्री. संजय जगन्नाथ बारबोले बार्शी.
साहित्य पुरस्कार – श्री सोमनाथ मधुकर टकले वडशिवणे ता करमाळा
अध्यात्मिक पुरस्कार – रामायणाचार्य ह भ प राजन महाराज काशीद पिंपरीकर, ता बार्शी
युवा उद्योजक पुरस्कार – श्री तुषार मोहन भोसले व सौ शुभांगी मोहन भोसले, रा.रुई. ता.बार्शी
समाजसेवा पुरस्कार – श्री. राहुल आगरचंद धोका, कुर्डूवाडी
कला पुरस्कार – श्री प्रदीप गोरख काळे बार्शी
More Stories
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड
करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक