बार्शी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत वेलणकर कॉलेज यांनी मुलींसाठी आयोजित केलेल्या अंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथें पार पाडल्या. या स्पर्धेत बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीच्या संघाने प्रथम तर सांगोला महाविद्यालय संगोलाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी संघाच्या गुणवंत खेळाडूमध्ये समृद्धी समीर वायकूळे, समृद्धी जम्मा, मांगडे वैष्णवी, देवकर सायली, माने साक्षी यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी मुलींच्य 14 संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा प्रसंगी क्रीडा शिक्षक डॉ. सुरेश लांडगे, महादेव वाघमारे, रवी कुणाळे, चेअरमन बाळासाहेब वाकचौरे, खंडू चव्हाण, भोसले, दळवी, आयोजक डॉ.समर्थ मनुकर, डॉ. दत्तप्रसाद मनोहर सोनटक्के उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड