बार्शी : सोलापूर जिल्हा बॅडमिंटन (Badminton) असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बार्शीतील वेदश्री बंडेवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
यामध्ये खेळाडूंनी चारपैकी दोन गटांमध्ये विजेतेपद, एक उपविजेतेपद मिळवून विजयाची परंपरा कायम राखली. अंतिम सामना पंढरपुरच्या आर्या शिंदेसोबत झाला. या सामन्यात विजय संपादन केला. महिला दुहेरीमध्ये समृद्धि वायकुळे आणि वेदश्री बंडेवार यांना अंतिम सामन्यामध्ये उपविजेतपदावर समाधान मानव लागले. पुरुष दुहेरीमध्ये प्रशिक्षक राहुल तिवाडी आणि आनंद मुसळे यांनी सोलापुरच्या ऋषिकेश जोगळेकर आणि विवेक समलेट्टी यांच्यावर मात केली.
सर्व खेळाडूंना आरटीबीए अॅकॅडमीचे प्रशिक्षक राहुल तिवाडी यांचे मार्गदर्शन लाभाले, युवा उद्योजक
जिग्नेश कोठरी, समाजसेवक व पत्रकार सचिन वायकूळे, डॉ. विक्रांत शाह, डॉ. विलास देशमुख व सर्व सभासदांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर