Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बार्शी उपशहर समन्वयक पदासाठी विजय माने यांची निवड

बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बार्शी उपशहर समन्वयक पदासाठी विजय माने यांची निवड

मित्राला शेअर करा

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्री . एकनाथ शिंदे व मा . ना . श्री . श्रीकांत शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक मंगेश नरसिंह चिवटे ( मूळ संकल्पना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मंत्रालय , मुंबई ) यांच्या सुचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बार्शी उपशहर समन्वयक पदासाठी विजय अर्जुनराव माने यांची निवड करण्यात आली आहे .

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातुन गोर – गरीब , गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात ( १० % + १० % ) राखीव खाटा (बेड)उपलब्ध करून देणे . निकषानुसार पात्र असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शन व मदतीचे कार्य केले जाते

तसेच गंभीर महागड्या शस्यक्रिया करावयाच्या असलेल्या गोर – गरीब , गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी , मुख्यमं सहाय्यता निधी श्री सिध्दिविनायक ट्रस्ट , टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्ट च्या माध्यमातुन मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाते .