Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व एमएसपीसी निवडणुक मार्गदर्शन सभा संपन्न

बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व एमएसपीसी निवडणुक मार्गदर्शन सभा संपन्न

बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व एमएसपीसी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन सभेचे आयोजन
मित्राला शेअर करा

दिनांक 15 मे 2022 रोजी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व एमएसपीसी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

विजयभाऊंनी सभेत बोलताना फार्मासिस्ट फर्स्ट, सर्वासाठी सर्वांसोबत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा सक्षम फार्मासिस्ट बनवण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फार्मसी कौन्सिल च्या माध्यमातून विविध कोर्सेस उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. सोमाभाऊंनी स्पर्धेला स्पर्धेनेच दिले पाहिजे व त्यासाठी स्वतः आपल्यात व व्यवसायात बदल करण्याचे आव्हान केले. बसवराज मनोरे सरांनी पोस्टल मतदान कशा पद्धतीने हाताळून कौन्सिलकडे परत पाठवण्याची विस्तृत माहिती सांगितली. सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजित गाढवे यांनी बार्शी संघटनेच्या कामाचे कौतुक करून यापुढेही त्यांना सर्वांनी भरघोस प्रेम व सहकार्य असेच चालू राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. फार्मसी कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष अरुण दादा व वर्षाताई यांनी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संस्थेच्या शिस्तबद्ध, संघटित, व्यवस्थापनाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

बार्शी संघटनेने येऊ घातलेल्या एमएसपीसी निवडणुकीसाठी लागणारे बॅलेट पेपर, मतपत्रिका नमुना, परिचय पत्र, अप्रोन, चिट्ट पॅड, पेन, संस्थेच्या विविध कार्यक्रमाचे माहिती पुस्तक इत्यादीची किट सर्वांना देण्यात आले. केमिस्ट बंधू-भगिनींना व्यवसाय वृद्धी साठी माहितीस्तव आवश्यक ते सर्व स्टॉल लावण्यात आले होते. बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सुधीरआबा राऊत यांनी सभेला विक्रमी सभासदांची उपस्थिती आणत त्यांना विविध उपक्रमाची माहिती देत एमएसपीसी निवडणुकीत सहाही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी शंभर टक्के मतदान करून घेण्याची हामी दिली.

सभेसाठी फार्मसी कॉलेज संस्थापक अध्यक्ष अरुण दादा व वर्षाताई, विजयभाऊ ,सोमाभाऊ बसवराज मनोरे साहेब, राजशेखर बारोळे, राजेश अण्णा विरपे, प्रशांतजी खलीपे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजीत गाढवे व इतर जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य करपे सर व भुसारे मॅडम, ज्येष्ठ केमिस्ट तसेच बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. अशी माहिती बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन प्रसिद्धी विभागाने दिली.