बार्शी, करमाळा व माढा या तीन तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेले बार्शीतील न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कामाची अंतिम मंजूरी व निधी मंजूरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

बार्शी शहरातील गाडेगाव रोड येथे साधारण १०.५० ( साडे दहा ) एकर जागा न्यायालयाच्या नूतन इमारतीसाठी आरक्षित असून, सदरील क्षेत्रात न्यायालयाच्या नूतन इमारतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उभारण्यात येणार आहे. सदर कामासाठी मागील अडीच वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे असे आमदार राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून जलदगतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले आहे. याची सुरुवात शासकीय पातळीवरून सुरू झाली असून, सचिवालयात न्यायालयाच्या नूतन इमारत निधी मंजूरीचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या सुखद निर्णयाची माहिती आज बार्शी न्यायालयातील बार असोसिएशनच्या कार्यालयात सर्व विधीज्ञ ( वकील ) बंधू-भगिनींना दिली. शासनाच्या या निर्णयाबद्दल सर्व वकील बंधू-भगिनींनी शिंदे-फडणवीस सरकारचे व आमदार राजाभाऊ राऊत यांचे आभार व्यक्त केले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award