बार्शी. ७ – बार्शी सायकलिंग क्लबचा दुसरा वर्धापन दिन व आझादी का अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली. उप विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ( ग्रामीण ) शिवाजी जायपात्रे, रेंज फॉरेस्ट अधिकारी मनोज बारबोले, जयकुमार शितोळे, खजिनदार शिवाजी प्रसारक मंडळ, महाराष्ट्र विद्यालय प्राचार्य जी. ए. चव्हाण सर, न. पा. शिक्षण मंडळाचे सुपरवायझर संजय पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पर्यावरण व आझादी का अमृतमहोत्सवाची जनजागृती व्हावी या उद्देशाने रॅलीचे आयोजन केले होते, विविध शाळेतील 1800 विद्यार्थी सहभागी होते पर्यावरणाचा समतोल व स्वतंत्र दिनाच्या घोषणा देत रॅलीचा समारोप करण्यात आला.
मा. बप्पा बारबोले, अजित मिरगणे, मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, उद्योगपती निलेश सरवदे, रघु चोप्रा, वैभव पाठक, दीपक कुणके, अॅड शाम झालटे सर्व बीसीसी मेम्बर्स, पोलीस खाते व वन विभाग, वृक्ष संवर्धन समिती, शिवाजी कॉलेज, विविध शाळा, मा. नागेश अक्कलकोटे मित्र मंडळ, एम. पी. यवनकर आदींनी मदत केली. सुधीर खाडे सरांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची बैठक उत्साहात संपन्न