Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > बार्शी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

बार्शी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

मित्राला शेअर करा

वृत्तपत्र विक्रेत्याची हेल्थ चेक अप मोफत करूण देणार; डाॅ.संजय अंधारे
बार्शी;
आमच्या कामाचे कौतुक करूण पाठीवर कौतुकाची थाप देऊन केलेला हा सन्मान आमच्यासाठी कायम स्मरणात राहील.माणसाने माणसाला  केलेली मदत सर्वात मोठी असते.हा सन्मान माझा नसुन माझ्या संपुर्ण टिमचा सन्मान आहे.शहरातील वृत्तपत्र विक्रेत्याची आरोग्य तपासणी मोफत करूण देणार असल्याचे प्रतिपादन डॉ.संजय अंधारे यांनी केले.ते बार्शी शहर व तालुका वृत्त पत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विक्रेता दिनानिमित्त आयोजित विशेष पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्कारास उत्तर देताना बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे सचिव प्रकाश पाटील होते.यावेळी क्राॅ. तानाजी ठोंबरे,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,अतुल सोनिग्रा,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,सचिन वायकुळे, ग्रोटेक ॲग्रोचे मंगेश बागुल,राष्ट्रवादीचे राजेंद्र गायकवाड,विक्रेता संघटनेचे गोरख भिलारे,शिवलिंग मेटगार,बार्शी शाखा अध्यक्ष बंटी बाबर,ताहेर काझी,शाम थोरात,आदींसह विक्रेते व पत्रकार  उपस्थित होते.

क्राॅम्रेड तानाजी ठोंबरे यावेळी बोलताना म्हणाले की डाॅक्टर,पोलीस, पत्रकार व विक्रेते हे खरे कोविड योद्धा आहेत.सध्याचा पत्रकारीता व्यवसाय विसंगतीमध्ये सापडलेला आहे.आपणाला सहज काहीच मिळणार नाही.सध्या कामगारांना वाऱ्यावर सोडले जात असुन लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय काही खर नसते असे सांगून आपन ज्ञान वाहुण नेणारे असलो तरी आपनच पेपर वाचत नाहीत अशी खंतही ठोंबरे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने बस स्टँड परिसरात पेपर गठ्ठे साॅर्टींग साठी बसण्यास जागेची आवश्यकता आहे ती मिळावी अशी मागणी बार्शी नगरपालिकेकडे केली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी वाचकांच्या पाठबळावर वृत्तपत्र व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या ताकतीने उभे राहतील असे सांगितले.

सचिन वायकुळे यांनीही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकुण अणेक वर्षांपासुन हे प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी डॉ. संजय अंधारे यांना मान्यवरांकडून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच वृत्तपत्र विक्रेते सचिन शेटे यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन सोमेश्वर देशमाने यांनी केले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष बंटी बाबर,शाम थोरात,ताहेर काझी,राजेंद्र आगावणे, सादिक शेख,दिनेश टेके,सचिन शेटे,बंडु नागटिळक,निलेश रूद्रवार,सचिन साबळे, मंगेश निंबाळकर, शिवाजी मोरे,सिद्देश्वर माळवदे, सोमनाथ गाढवे आदींनी परिश्रम घेतले.