बार्शी : लायन्स क्लब बार्शी , विधी सेवा समिती बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत दडशिंगे येथे विधी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते .
यावेळी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायमूर्ती संधू , लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. विकास जाधव , बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अॅड काका गुंड ,ॲड.अविनाश जाधव , भगवंत पोळ , क्लबचे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी , लायन्स क्लबचे दत्तक गाव योजनेचे समन्वयक गिरीश शेटे , सरपंच सचिन गोसावी , उपसरपंच विलास पाटील , माजी उपसरपंच पांडुरंग घोलप , ग्रामपंचायत सदस्य बापूराव घोलप , खंडू हजारे , आलम मुलाणी , दादाराव काळे , दत्तात्रय काळे , आण्णासाहेब काळे , ग्रामसेविका पाटील , हनुमंत देसाई , सुग्रीव काळे , अनिल घोलप यांच्यासह विविध पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते .
या शिबिरात गावातील तंटे गावात कसे मिटवावेत यावर न्यायमूर्ती संधू यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . गावातील होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाचे न्यायमूर्ती संधू यांनी कौतुक केले . प्रास्ताविक लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी केले . सूत्रसंचालन पांडुरंग घोलप तर आभार सचिन गोसावी यांनी मानले
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान