Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी नगरपालिकेच्या प्रशासक पदावर मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती

बार्शी नगरपालिकेच्या प्रशासक पदावर मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती

मित्राला शेअर करा

बार्शी नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत बुधवारी पूर्ण झाली. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ‘ अ ‘ वर्ग असलेल्या बार्शी नगरपरिषदेच्या प्रशासकपदी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची बुधवारी शासनाने नियुक्ती केली आहे.

बार्शी नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत बुधवारी पूर्ण झाली. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ‘ अ ‘ वर्ग असलेल्या बार्शी नगरपरिषदेच्या प्रशासकपदी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची बुधवारी शासनाने नियुक्ती केली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया वेळेआधी झाली नाही.निवडणुका घेण्यासाठी आणखी किती काळ लागणार हे निश्चित नाही. त्यामुळे शासनाच्या नगर विकास विभागाने संदर्भ क्र. १ च्या अनुषंगाने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती केली. त्यानुसार याबाबत संदर्भ क्र . २ व ४ अन्वये आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी ( दि. २९ ) मुदत संपल्याने मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची नव्या आदेशानुसार नियुक्ती केली आहे.