Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > बार्शी राजपूत समाज संघाच्या अध्यक्षपदी लखन राजपूत, सचिवपदी मनिष चौहान

बार्शी राजपूत समाज संघाच्या अध्यक्षपदी लखन राजपूत, सचिवपदी मनिष चौहान

बार्शी राजपूत समाज संघाच्या अध्यक्षपदी लखन राजपूत, सचिवपदी मनिष चौहान
मित्राला शेअर करा

बार्शी – शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि तरुण मित्र लखनसिंग राजपूत यांची बार्शीतील राजपूत समाज संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समाजकार्यातील त्यांचा सक्रीय सहभाग आणि सामाजिक जाणिवेतून सातत्याने विधायक कामात पुढाकार घेत असल्याने राजपूत यांची समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सल्लागार मंडळाने राजपूत समाजच्या अध्यक्षपदी निवड केली. तर, सचिवपदी माजी नगरसेवक मनिष चौहान यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, उपाध्यक्षपदी अजय तिवारी व राहुलसिंह परदेशी आणि खजिनदारपदी आकाश परदेशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

लखनसिंग यांचे वडील पृथ्वीराज राजपूत हे माजी नगरसेवक आहेत, त्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. तसेच, आझाद गणेश मंडळ आणि अनिल मालक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरीरीने पुढाकार आहे. राजपूत समाजच्यावतीने दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या वीर महाराणा प्रताप यांच्या जयंती कार्यक्रमातही ते नियोजन मंडळात असतात.

या निवडीनंतर राजपूत समाजच्यावतीने त्यांचा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, मोहनसिंह चंदेले, उमेश अण्णा राजपूत, आतिश बीसेन, अमोल राजपूत, पिंटू परदेशी यांसह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, आझाद गणेश मंडळ आणि मित्र परिवाराच्यावतीनेही त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष – लखनसिंग राजपूत
सचिव – मनीष दादा चौहान
उपाध्यक्ष – अजयसिंह तिवारी
उपाध्यक्ष – राहुल परदेशी
खजिनदार – आकाश परदेशी