बार्शी तालुका गणित मंडळाची त्रैवार्षिक कार्यकारणी निवड करण्यासाठी सहविचार सभा मा जी. ए. चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रक संतोष साळुंखे माजी अध्यक्ष मंगेश सोनवणे यांच्या उपस्थितीत सुलाखे हायस्कुल बार्शी इथे पार पडली.

प्रताप दराडे यांनी सभेचा उद्देश तसेच संबोध, प्राविण्य, प्रज्ञा, परीक्षा आयोजनाबद्दल गणित शिक्षकांना माहिती दिली या परीक्षेस सर्व शाळा मधून भरपूर विद्यार्थी बसवावेत असे सर्वानुमते ठरले.
नूतन तालुका अध्यक्ष म्हणून शंकर आगलावे यांची तर सचिव पदी सचिन झाडबुके यांची एकमताने निवड झाली
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष अमोल माढेकर व संदेश घाडगे सह सचिव जैनुद्दीन शेख, परीक्षा प्रमुख सूर्यकांत चोरमूले, खजिनदार सिद्धेश्वर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख केदार गुडे, प्रकाशन समिती अभिजित भोसले, महिला प्रतिनिधी रुपाली गजभार, वैराग विभाग प्रमुख संतोष घोलप, विज्ञान मंडळ प्रतिनिधी मुख्तार मुलाणी,l व विलास मांजरे यांची सर्वानुमते निवड झाली
नूतन कार्यकारणीस जिल्हाध्यक्ष सूर्यकांत चोरमूले अबूबकर इनामदार मुख्याध्यापक सुरेश जगदाळे, मधुकर शेळके, विक्रम टकले स्वामीराव हिरोळीकर यांनी तसेच सर्व गणित शिक्षकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार