बार्शी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बार्शी तालुका संघचालकपदी बार्शीतील उद्योजक आनंद नंदकिशोर सोमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
पुणे विभाग rss संघचालक संभाजी गवारे यांनी सोमाणी यांची नियुक्ती केली . याप्रसंगी जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर , जिल्हा सहकार्यवाह किरण सुतार तालुका कार्यवाह मोहन शिरामे व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यापुर्वीचे संघचालक विगो बंडेवार यांचे निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते . सोमाणी हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत . सोमाणी यांना तालुका संघसंचालक पदाचा मान मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान