Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी तालुक्यासाठी २ कोटी १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी तालुक्यासाठी २ कोटी १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२० – २१ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून २ कोटी १ लाख रूपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

या योजनेचा लाभ तालुक्यातील खांडवी, घाणेगांव, सर्जापूर, आगळगांव, उपळाई ठो. झरेगांव, कव्हे, पानगांव, तांबेवाडी, देवगांव, लाडोळे, महागांव, मांडेगांव, रुई, साकत, बावी आ. पिंपरी पा. खडकोणी, मळेगांव, चारे, श्रीपत पिंपरी, धोत्रे, शेंद्री, जामगाव पा. निंबळक आदी या गावांतील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे यांचे आभार मानले.

यावेळी पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, पं.स.उपसभापती मंजुळाताई वाघमोडे, माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे सर, किरण मोरे, समाधान डोईफोडे, पंचायत समिती सदस्य अविनाश मांजरे, इंद्रजित चिकणे, उमेश बारंगुळे, सुमंत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.