ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करा
उस्मानाबाद; राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट मदत दिली पाहिजे त्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायला हवी,पहिली जबाबदारी राज्याकडून अपेक्षित,केंद्र सरकारकडे मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मागणी करून गरीब शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भर पावसात उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी येथे अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मराठवाड्यात पाऊस कमी असतो त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांची वाईट स्तिथी झाल्या सरकारने ताबडतोब sdrf च्या माध्यमातून सरसकट मदत करावी यासाठी लक्ष केंद्रित करावे,मागील वर्षी विमा पैसे मिळाले नाही.विमा कंपन्यांनी ग्रामसेवक यांचे अहवाल ग्राहय धरले पाहिजेत.सरकारने यात लक्ष देऊन मराठवाड्यात सरसकट मदत युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे,शेतीत पिकलेल्या सोयाबीनचा कुजून वास येत आहे.इतर विषय बाजूला ठेवून सरकारने याकडे सरसकट मदत युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे केवळ मंत्री दौरे करून भागणार नाही सरकारी बाबूंनी मदत लवकर करावी अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील,रोहित पडवळ,विष्णू इंगळे,आकाश मुंडे,दाऊतपुरचे सरपंच बंकट शिंदे,मोहसीन पठाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
More Stories
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत