सदरच्या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे, यांनी नव्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे प्रमाणित केलेले आहे. सदर योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार आगळगांव येथील तलावाची साठवण क्षमता २६० स.घ.मी. असून, उपळाई ठों येथील तलावाची साठवण क्षमता २४७ स.घ.मी. इतकी आहे. नियोजीत सिंचन क्षमता १२७ हेक्टर इतकी आहे.
सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्ती साठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.
आत्ता पर्यंत आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी लघू प्रकल्प, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव मंजूर करून घेतलेले आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असून, याचा फायदा या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे.
बार्शी तालुक्यात हरीत क्रांतीचे सतत स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजाभाऊ राऊत यांनी, बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी साठवण तलाव करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला होता.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!