योगाची सुरुवात भरतातच झाली अणि योगाला हजारो वर्षांचा इतिहास आहे तरीही योगाचे खरे महत्व जगाला पटले ते कोविड काळात.
अज भरातच नाही तर जगभरातील लोक दररोज योग, योगाभस याद्दल माहिती इंटरनेटवर सर्च करताना दिसतात यावरून जागतिक पातळीवर योगाचे महत्व लक्षात येते.
शालेय विद्यार्थ्यांना योग व योगासने यांचे महत्व लक्षात यावे यासाठी सर्व शैक्षणिक संसंस्थांमध्ये योग दिवस साजरा केला जातो.
आज महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री. सुरेश महामुनी सर यांनी योगगुरूची भुमिका पार पाडली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, श्री. ए. वाय. पाटील, श्री.सुरेश डिसले, श्री. पी. डी. पाटील, श्री. योगेश उपळकर, श्री. एस. बी. बारंगुळे, श्री.अतुल नलगे, श्रीमती एस. एल. शिंदे, श्रीमती पी. एस. जाधव, श्रीमती पांढरे मॅडम, श्रीमती शेळके मॅडम उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी योगगुरू श्री. सुरेश महामुनी सरांनी योगाचे सर्व प्रकार कृतीयुक्त पध्दतीने विद्यार्थ्यांना दाखवत सर्व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न