बार्शी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून, आमदार राजाभाऊ राऊत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या भेटीला.

दिल्ली येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन, त्यांना बार्शी तालुक्यातील बार्शी तुळजापूर रस्ता राज्य मार्ग क्र. २०६ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत, तसेच बार्शी तालुक्यातून जाणारा माढा-वैराग-उस्मानाबाद रस्ता राज्य मार्ग क्र.२०३ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत व बार्शी तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी सी. आर. एफ. अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा या मागणी संदर्भातील पत्र दिले.
यावेळी माढ्याचे खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.
याबाबत मा. नितीनजी गडकरी यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देत, पत्रातील मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून लवकरच निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही दिली.
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा