Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता

विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सांगितले
मित्राला शेअर करा

कोरोनामुळे मागील दोन वर्षे विद्यापिठ बंद होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज उदय सामंत यांनी याबाबत ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.

ट्विटर वर दिली माहिती

https://twitter.com/samant_uday/status/1511637736456740865?t=1xdjtVgOLeCv6Xfice8paQ&s=19

कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असणारी विद्यापीठे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.

त्यांनी सांगितले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) ३७ कोटी ५८ लाख ३३ हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच मध्यंतरी प्राध्यापक भरतीचे महाराष्ट्र शासन राजपत्र ही प्रसिद्ध झाले आहे.