बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांची सतत गैरसोय होत आहे. या रस्ता दुरुस्ती व रस्ते पक्के करण्याकरीता शासनाच्या विविध योजनांमधून बार्शी तालुक्याकरिता आमदार राजेंद्र राऊत यांनी सतत निधी उपलब्ध केला आहे. यापूर्वीही ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे, जेणेकरून पक्के रस्ते झाल्यानंतर दळणवळण चांगले होण्यास मदत होईल. या रस्त्यांकरिता एकुण 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याची तरतूद सन 2022-2023 च्या अर्थसंकल्पात केली असून लवकरच या कामांची निवीदा प्रसिद्ध होवून कामास सुरुवात केली जाईल असे त्यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दुरावस्था, ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे सतत प्रयत्नशील असून यापूर्वीही त्यांनी तालुक्यातील रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी व तरतूद केलेल्या रस्त्यांची नावे व निधी पुढील प्रमाणे-
1) वैराग-हिंगणी-मळेगांव -चिखर्डे-गोरमाळे-पांगरी -उक्कडगांव ते जिल्हा हद्द. हा 9 किमी. रस्ता सुधारण्यासाठी 3.80 कोटी रुपये.
2) बार्शी कवे कोरफळे मालवंडि मानेगाव या 10.500 किमी रस्ता सुधारणा करीता 1 कोटी 90 लाख रुपये.
3)
बार्शी-आगळगाव-काटेगाव-चुंब-कोरेगांव या 20.7 किमी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी 80 लाख रुपये.
4) गौडगाव ते कात्री या 2.5 किमी रस्ता सुधारणा करीता 1 कोटी 42 लाख रुपये
5) कासारी ते जिल्हा हद्द या 4 किलोमीटर रस्ता सुधारणा करीता 1 कोटी 14 लाख
6) श्रीपत पिंपरी ते राज्यमार्ग क्रमांक 145 ला जोडणारा 5.50 किमी. रस्ता सुधारणा करीता 1 कोटी 71 लाख रुपये
7) रुई-अंबाबाईची वाडी-ज्योतीबाची वाडी या 10 किलोमीटर अंतराचा रस्ता सुधारणा करता 2 कोटी 37 लाख रुपये
8) तडवळे ते राळेरास या 8 किमी. रस्ता करीता 1 कोटी 90 लाख रुपये
9) शेंद्री ते उपळाई ठोंगे या 6 किमी. रस्ता सुधारणा करता 95 लाख रुपये
सदरील रस्त्याची कामे मंजूर करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी सतत महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती महाराष्ट्र शासनास केली होती.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद