खुप विस्तृत पण यातून उस्मानाबादकरांना विशेष काय मिळाले ? राज्यातील अनेक प्रकल्पांचा भाषणात उल्लेख झाला, मात्र उस्मानाबादकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मागण्या सोलापूर – तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग , मराठवाडा वॉटर ग्रीड , महिला रुग्णालय विस्तारीकरण, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा प्रशाद योजनेमध्ये समावेश व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पांचा साधा उल्लेखही झाला नाही असे मत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
राज्यात इतर ठिकाणी १०० खाटांची नवीन महिला रुग्णालये मंजूरीच्या घोषणा आज झाल्या, मात्र नितांत आवश्यकता असताना, अनेक वर्षाची मागणी असूनही उस्मानाबाद येथील महिला रुग्णालय विस्तारीकरणाचा सरकारला पूर्णतः विसर पडला. महिलांच्या आरोग्याविषयी महाविकास आघाडी सरकारची एवढी अनास्था अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून याहून अधिक अर्थसंकल्पावर काय बोलणार ? शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडुन दिल्यानंतर ठाकरे सरकार यावर्षी तरी न्याय करेल, ही जिल्हावासियांची अपेक्षा पुन्हा एकदा फोलच ठरली. यावर उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. हे सर्वजण त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ दिसतात व ही आपल्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट