विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त, भिमटायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी, यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत दंत रोग तपासणे व मोफत दात काढणे व इतर दंतरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

डाॅ. विनोद भालेराव व डाॅ. सोनाली भालेराव यांचे मार्फत व मा. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबीर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास बार्शी नगरपरिषदे नगराध्यक्ष मा अॅड असिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील, आरोग्य सभापती संदेश काकडे, दीपक (आबा) राऊत, सुनीलअवघडे (दलित महासंघ जिल्हाध्यक्ष) ,अॅड राजश्री डमरे, ॲड वसुदेव ढगे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
विशेष उपस्थिती — या शिबिरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड सुप्रिया गुंड पाटील तसेच ॲड. उषा पवार यांचीही उपस्थिती होती.
भीम टायगर मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था बार्शी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच 122 लोकांची दंत चाचणी व दंतरोग चाचणी करण्यात आली.
शंकर (दादा) वाघमारे, दयावान (आप्पा) कदम, राहुल (भैया) बोकेफोडे, नितीनदा मस्के, भालचंद्र राजगुरू (सर), निलेश वाघमारे, अजय कदम, मिलिंद ताकपिरे (सर), अॅड वृषाली वाघमारे, ज्योती बोकेफोडे, प्रियांका कदम तसेच भीम टायगर मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी हे रक्तदान शिबीर व दंतरोग शिबीर यशस्वीपणे पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न