Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल

बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल

बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल
मित्राला शेअर करा

बार्शी -: उच्च न्यायालय, मुंबई यांनी घेतलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये बार्शीतील वकील सुदर्शन शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल बार्शी न्यायालयात आणि वकिली क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या सातत्याच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे बार्शीपुत्र न्या. दिनेश गायकवाड यांनी सांगितले.

सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला प्रवास हा प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. आपल्या विधी क्षेत्रातील करिअरमध्ये त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील राहिले, आपला संयम व सातत्य जपल्यानेच हे यश त्यांना मिळालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत त्यांनी तीन वेळा मुलाखत दिली होती, परंतु यश मिळवण्यात त्यांना अपयश आले होते. अखेर, जिल्हा न्यायाधीशपदी त्यांची वर्णी लागल्याने त्यांच्या कष्टाचे चीज झाले. सुदर्शन शिंदे यांनी 2023 च्या जिल्हा न्यायाधीश पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अपयशाची मालिका खोडून काढलीय.

सुदर्शन शिंदे मूळचे वैरागचे रहिवासी असून सध्या ते बार्शी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांचे वडील देखील बार्शी येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना विधी क्षेत्राबद्दलचं ज्ञान लहानपणापासूनच मिळालं होतं, ज्यामुळे त्यांची आवड आणि समर्पण वाढलं.