बार्शी तालुक्याचे सुपुत्र एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेले पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण शास्त्र सल्लागार रावसाहेब मिरगणे यांची उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.

नगरपरिषद शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारी पदी असताना त्यांनी परीक्षा देऊन हे यश मिळवले आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रावसाहेब मिरगणे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी या पदावर शालेय शिक्षण विभागाने नियुक्ती केली आहे.
मिरगणे यांनी बार्शी शिक्षण मंडळासह, अहमदनगर , कोकण विभागातील शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल बार्शी शहर आणि तालुक्यातून शिक्षण क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा