Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद, संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर अकलूजला तिसरे बक्षीस

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद, संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर अकलूजला तिसरे बक्षीस

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद, संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर अकलूजला तिसरे बक्षीस
मित्राला शेअर करा

मंगळवेढा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक 91 गुणांसह बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद 50 गुणांसह संगमेश्वर कॉलेज तर 49 गुण घेऊन अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने तिसरे पारितोषिक मिळविले.

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी पारितोषिक वितरण झाले. सिने अभिनेत्री सैराट रिंकू राजगुरू आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. कुलसचिवा योगिनी घारे, संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, डॉ गुणवंत सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

ललित, वांग्मय, नाट्य या तिन्ही विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास मिळाला. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कॉलेजला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी मानले.