वृक्ष संवर्धन समिती,बार्शी. च्या उपक्रमाची OMG Book of Record मध्ये National Record म्हणुन नोंद
बार्शी : ९ ऑगष्ट २०२२ रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधुन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी ने “हर घर तिरंगा हर घर एक पेड” हि संकल्पना पत्र लेखनातून राबवली.
यामध्ये एकाच दिवसात १०,०७५ (दहा हजार पंचाहत्तर) भारतीय डाक पत्र बार्शी शहरातुन विद्यार्थी तसेच नागरिकांनी महाराष्ट्र भर आपल्या अप्तेष्ठांना लिहुन पाठवली व त्यात त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तिंना एक झाड लावण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्र हरित करण्यासाठी हा एक क्रांतिकारी असा उपक्रम ठरला यानिमित्त ‘नॅशनल रेकॉर्ड’ म्हणुन नोंद झाली अशी माहिती समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद