Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीत भगवंत महोत्सवास दिमाखात प्रारंभ, सर्व नेते व्यासपीठावर

बार्शीत भगवंत महोत्सवास दिमाखात प्रारंभ, सर्व नेते व्यासपीठावर

सबंध भारतात एकमेव असलेल्या श्री भगवंत देवाच्या महोत्सवास ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्या कीर्तनाने शनिवारपासून मोठ्या प्रारंभ
मित्राला शेअर करा

बार्शी : सबंध भारतात एकमेव असलेल्या श्री भगवंत देवाच्या महोत्सवास ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्या कीर्तनाने शनिवारपासून मोठ्या प्रारंभ झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्र आल्याचे चित्र बार्शीकरांना पाहावयास मिळाले.


भगवंत देवस्थान ट्रस्ट बार्शी नगरपरिषद आणि भगवंत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल माजी खासदार शिवाजी कांबळे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर माजी नगराध्यक्ष अशी तांबोळी मंगल शेळवणे रमेश पाटील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे माजी उपनगराध्यक्ष कृष्ण राज बारबोले भगवंत देवस्थान चे सरपंच दिलीप बुडूख उत्सव समितीचे प्रमुख सुभाष लोढा मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील प्रकाश बोधले महाराज बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा झाडबुके माजी नगरसेविका वर्षा रसाळ माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे बार कौन्सिलचे अध्यक्ष धनंजय जगदाळे नाना सुरवसे मुकुंद कुलकर्णी रिपाईचे अविनाश गायकवाड शंकर वाघमारे देवा खटोड श्रीधर कांबळे उपस्थित होते


यावेळी आ. राजेंद्र राऊत म्हणाले भगवंत देवस्थानच्या तीर्थक्षेत्रासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणी कोणत्याही पक्षात असू द्या पण आपल्या ग्रामदैवतासाठी जेवढे काही करता येईल तेवढे कमी आहे, असे आ. राऊत म्हणाले. माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले, भगवंत देवस्थान भारतात कोठेही नाही. भविष्यात कोणाचेही सरकार आले तरी त्या लोक प्रतिनिधी बरोबरच सर्वानी खांद्याला खांदा लावून प्रयत्न करावे लागतील.


यावेळी कॉ. तानाजी ठोंबरे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी ही विचार व्यक्त करून निवडणुकीपुरते राजकारण करून इतर वेळी बार्शी च्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. भगवंत मैदानावर यावेळी मोठी गर्दी झाली होती. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी तर सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले.

बार्शीची राष्ट्रीय एकात्मता देशाला प्रेरणादायी
बार्शीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. मुस्लिम नगराध्यक्ष असतानाही बार्शीचा भगवंत महोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे, ही गोष्ट काही कमी नाही. धामणगावच्या माणकोजी बोधले महाराज मंदिरावर चंद्रकोर आहे म्हणूनच बार्शीची एकात्मता देशाने घेण्यासारखे असल्याचे प्रकाश बोधले महाराज यांनी सांगितले.

ही भगवंताची इच्छा
आईला सर्व लेकरे एकाच छताखाली असावेत असे वाटत असते. भगवंत ही बार्शीकरांची आईच आहे त्यामुळेच आमदार राऊत, माजी मंत्री सोपल यांच्यासह सर्वच जण आज व्यासपीठावर असल्याने बार्शीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले, असेही प्रकाश बोधले महाराज यावेळी म्हणाले.