मध्यंतरी आपण ऐकले असेल बार्शीतील देवीदास हरीचंद्र जाधव रा.पंकजनगर बार्शी या रिक्षाचालकाने एका व्यापाऱ्याची रिक्षा मध्ये विसरलेली पैश्याची बॅग पोलीस अणि ओन्ली समाज सेवा ग्रुप व पोलिस जाणिव सेवा संघ यांच्या प्रयत्नाने त्या व्यापाऱ्यास परत केली होती.

आज पुन्हा बार्शीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणाचा प्रत्यय बार्शीकरांना आला आहे.
कॅन्सर हॉस्पिटल चौक रिक्षा स्टॉप येथील रिक्षा चालक व ओन्ली समाज सेवा Group चे प्रमुख सदस्य सचिन श्रीमंत लोकरे यांना त्यांचे रिक्षात सापडलेला किमती मोबाईल त्यांनी सुभाष नगर पोलीस चौकीत हजर केलं असता त्यांचे रिक्षातील प्रवास करणारे प्रवासी लक्ष्मण जाधव यांना खात्री करून त्यांचा मोबाईल भैया वाणी ,राहुल वाणी, अकबर तांबोळी ,अनिल खुडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दबडे यांचे समक्ष परत देण्यात आला.
More Stories
भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश