Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > बार्शीतील नाट्य स्पर्धेचा उत्साहात समारोप

बार्शीतील नाट्य स्पर्धेचा उत्साहात समारोप

बार्शी : बार्शीत यशवंतराव चव्हाण सभागृहात चार दिवस सुरू असलेल्या १८ व्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप 'संपल्या संवेदना, संपला संवाद' या बालनाटकाने झाला.
मित्राला शेअर करा


कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ साहित्यीक सोमेश्वर घाणेगावकर, सचिन वायकुळे, स्पर्धा समन्वयक प्रवीण गाढवे, कविता कदम आदी उपस्थित होते. यावेळी सचिन वायकुळे, सोमेश्वर घाणेगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. वायकुळे म्हणाले त्याचबरोबर बार्शी शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना नाटकाची आवड निर्माण व्हावी व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे कार्य करत असताना, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी बार्शीकर सरसावले नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १८ व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी बार्शी मध्ये नुकतीच मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडली. बार्शी येथील कलायात्री सांस्कृतिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडे या स्पर्धेचे यजमानपद होते.


स्पर्धेमध्ये विविध ठिकाणाहून २१ संघांनी सहभाग नोंदवत विविध विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केले. सदरील स्पर्धेमधील विजेत्या संघांची पुढील फेरीसाठी निवड होणार असल्याचे स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी सांगितले. परीक्षक म्हणून जेष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीष भुतकर, प्रा. केशव भागवत, प्रा. बाळासाहेब नवले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन क्षितिजा गायकवाड यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंजुषा काटकर, अतिश पालके, अबोली दिक्षित-पालके, गणेश इंगोले, गणेश रजपुत, जगन्नाथ जाधव, परमेश्वर चांदणे, परवीन मुल्ला, अंजली पवार, साक्षी बलदोटा, हर्षदा देशमुख आदींनी परिश्रम घेतले.