Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > भगवंत नगरीत वडार समाज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

भगवंत नगरीत वडार समाज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

भगवंत नगरीत वडार समाज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
मित्राला शेअर करा

बार्शीच्या भगवंत नगरीत वडार समाज सामुदायिक विवाह सोहळयाचे तिसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. मा. बाळासाहेब तातेड यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक मा. बाळासाहेब तातेड आणि वडार समाजाच्या महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती सुनिताताई जाधव यांच्या संयुक्त सहकार्यातून यावर्षी पाच जोडयाचा विवाह बुधवार दि. २१ जून २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून ०५ मि. लिंगायत बोर्डिंग बार्शी येथे संपन्न होणार आहे.

या विवाह सोहळयातील नवदांपत्यांना मणी मंगळसूत्र, सफारी, शालू, दिवाण गादीसह संपूर्ण संसार, वऱ्हाडी मंडळीसाठी मिष्टान्न भोजन, रथातून मिरवणूक अशी सेवा देण्यात येते. याशिवाय या नवदांपत्यांना प्रथम कन्यारत्नाचा जन्म झाल्यास तिच्या नावे ५००० रुपयाची कायम ठेव केली जाते. हा विवाह सोहळा वडार समाजाच्या जुन्या चालीरिती व रुढी परंपरा जतन करून शांततेत पार पाडला जातो. सदरील विवाह सोहळ्यास कोणत्याही राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकडून कोणत्याही आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत स्वीकारली जात नाही. किंवा कोणत्याही प्रकारची शासकीय मदत किंवा अनुदान घेतले जात नाही. याविषयी कोणाची शंका किंवा तक्रार असेल तर ९८८१६५३२५६ आणि ९८२२६४३०२४ या नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हा विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी स्वतः बाळासाहेब तातेड, श्रीमती सुनिताताई जाधव, श्रीमती रिमताताई साठे, श्रीमती अनिताताई देवकर, संतोष कोंडिबा जाधव, अविनाश जाधव, दिलीप इटकर, गणेश जाधव, सचिन माने, राहूल अस्वदे, संतोष शेटीबा जाधव, भिमा चौगुले, प्रकाश इटकर, अशोक जाधव, आनंद इटकर अशा संयोजकासह वडार समाजाचे अनेक कार्यकर्ते नियोजन करत आहेत. तरी समाजातील समाज बांधव व राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना या नवदांपत्यास शुभाशीर्वाद दयावेत असे आवाहन निमंत्रक श्री बाळासाहेब तातेड आणि श्रीमती सुनिताताई जाधव यांनी केले आहे.