Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे येथे मार्च 2023 एस एस सी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे येथे मार्च 2023 एस एस सी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे येथे मार्च 2023 एस एस सी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात साजरा
मित्राला शेअर करा

दिनांक 16 जून रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे येथे मार्च 2023 रोजी झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

या बोर्ड परीक्षेमध्ये 55 विद्यार्थ्यांपैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल ९६. 36 टक्के लागला असून प्रशाले मधील कुमारी तनुजा अनिल मिन्ढे या विद्यार्थिनीने 92 टक्के गुण संपादन केले द्वितीय क्रमांक कुमार अभिषेक विजयकुमार वाघमोडे व शैलेश नंदकुमार वाघमोडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 91.80% गुण संपादन केले तर तृतीय क्रमांक कुमारी प्रणिता शिवाजी वाघमोडे या विद्यार्थिनींनी 91 टक्के गुण संपादन केले प्रशालेतील तेरा विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण संपादन केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री विजयकुमार वाघमोडे तसेच गावचे उपसरपंच श्री प्रमोद वाघमोडे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ बालिका ताई मिन्ढे पालक श्री अनिल मिंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग कांबळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांनी शाळेच्या विकासासंदर्भात व शाळेच्या ध्येयधोरणासंदर्भात विचार व्यक्त केले.

ग्रामस्थांच्या वतीने प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.