या कार्यक्रमासाठीअध्यक्ष म्हणून भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक व लायन्स क्लब बार्शी रॉयल चे माजी अध्यक्ष मा.श्री.संतोष प्रल्हादराव गुळमिरे सर व प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सूर्यकांत घुगरे सर माजी प्राध्यापक भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी तसेच मा. श्री. विजयकुमार गुळमिरे सर अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी व पर्यवेक्षक शेठ अगरचंद कुंकलोळ हायस्कुल बार्शी यांनी विध्यार्थ्यांना परीक्षेबाबत सर्व माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इयत्ता १० वीच्या वर्गशिक्षका श्रीमती जगताप मॅडम यांनी केले इ १०वी तील मुलांनी शाळेसाठी महापुरषांचे फोटो भेट दिले तर सूत्रसंचालन इयत्ता १० वीतील विध्यार्थीनी कु.वैष्णवी महाकर हिने केले.इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत असताना त्यांनी शाळेसाठी थोर नेत्याचे फोटो आठवण म्हणून भेट दिले.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री अतुल माने सर यांनी संस्थापकाच्या व मुख्याध्यापक यांच्या परवानगीने केले.
कार्यक्रमाची सांगता मा.श्री.संतोष गुळमिरे सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली तसेच सर्व पाहुण्यांचे आभार इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांनी कु.नेहा कळंबे हिने मानले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!